इंद्रधनु पार्क या गृहप्रकल्पातील सुमारे 12 एकर वृक्षलागवड
Pranav Buildcon | 02 Jan 2019मिरजेत शहराच्या मध्यवर्ती भागात आकार घेत असलेल्या इंद्रधनु पार्क या भव्य गृहप्रकल्पातील सुमारे 12 एकर इतक्या व्यापक क्षेत्रावर वृक्षलागवड व वनशेती कार्यक्रमाचा शुभारंभ प्रणव बिल्डकाॅन तर्फे करणेत आला.
या क्षेत्रावर अत्याधुनिक पध्दतीने बांबु लागवड करण्यात आली आहे.
वृक्षरोपणाच्या या कार्यक्रमास या भागातील अनेक सन्माननीय नागरिक व प्रणव बिल्डकाॅन चा सर्व स्टाफ श्रमदानात सहभागी झाले होते..
यावेळी प्रणव बिल्डकाॅनचे चेअरमन श्री.किशोर पटवर्धन यांनी या ग्रूहप्रकल्पाच्या डेव्हलपमेंटची रचना व माहिती दिली.. शहरी क्षेत्रात व्यापक प्रमाणात वृक्षलागवड करत असताना येणारे तांत्रिक अडथळ्यांबाबत मा.वनमंत्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे डेव्हलपमेंट फोरम सांगली मिरज चे माध्यमातून पाठपुरावा केला होता त्यावेळी मा. मंत्री महोदयांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या व उपक्रमातील अडथळे दूर झाले.
खाजगीरीत्या विकसीत होणारा, सामाजिक व पर्यावरण पुरक असा आणि संपूर्ण परिसर हिरवागार करणारा हा महाराष्ट्रातला एक आगळावेगळा किंबहूना एक दिशादर्शक प्रकल्प होणार असल्याचे श्री पटवर्धन यांनी यावेळी सांगितले..
या कार्यक्रमास अजित पोतदार, बाळासाहेब डोंगरेमाळी, सुनिल दिवेकर, मिलींद परचुरे, बाजीराव जाधव, शंकरराव काळे, तुकाराम घोरपडे, सुधीर देसाई, प्रसाद करमरकर, विवेक शेटे, निलेश अग्रवाल, अरूण सन्मुख, श्री.झणकर, नंदकुमार सुतार, सरोदे सर, प्रकाश देवल, शरद कुंभार, वर्षा गणपुळे, तसेच प्रणव बिल्डकाॅनच्या संचालीका सौ.इरावती पटवर्धन, प्रणव पटवर्धन यांच्यासहीत डेव्हलपमेन्ट फोरमचे श्री.नंदु पवार, दादासाहेब कांबळे, विशाल चौगुले, खलील अत्तार, नरेंद्र मंगावते, स्वप्नील भोरे, विजय कुलकर्णी, ईम्रान बेग, यांच्यासहीत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, या भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चहापानाने या वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता झाली...
Photos :