प्रणव बिल्डकॉन मिरज तर्फे जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम.
Pranav Buildcon | 05 Jun 2021Total Views : 1608प्रणव बिल्डकॉन मिरज तर्फे जागतिक पर्यावरण दिवसा पासून व्यापक वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात ...
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रणव बिल्डकॉन, मिरज आणि क्रेडाई सांगली विमन्स् विंग यांनी संयुक्त विद्यमाने, प्रणव बिल्डकॉन च्या ऑक्सिजन पार्क मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊनशीप मधील प्रमुख रस्त्यांवर, फणस, रतनगुंज, बहावा इ. भारतीय वृक्षांची लागवड करून चालू वर्षाच्या वृक्षलागवडीचा शुभारंभ केला.
या कार्यक्रमाचे वेळी, कोरोना योद्धा ठरलेल्या सर्व `आशा` वर्कर्सचा क्रेडाई सांगली तर्फे हेल्थ किट्स देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रणव बिल्डकॉन च्या संचालिका व क्रेडाई सांगली विमन्स् विंग च्या कन्वेनर सौ. ईरावती पटवर्धन, व क्रेडाई सांगली विमन्स् विंग च्या मेघना कोरे, मंजिरी कुलकर्णी, तसेच म. न. पा. उपायुक्त स्मृती पाटील, क्रेडाई सांगली चे पदाधिकारी जयराज सगरे, उत्तम आरगे, दिलीप पाटील, इम्रान मुल्ला, आनंदराव माळी, योगेश कुलकर्णी, महावीर पाटील, प्रणव पटवर्धन हे मान्यवर उपस्थित होते.