निशिगंध अपार्टमेंटस् चे उद्घाटन
Pranav Buildcon | 01 May 2019Total Views : 1512
बकुळ बाग, मिरज येथील प्रणव बिल्डकॉन प्रा.ली.ने उभारलेल्या निशिगंध अपार्टमेंटस् चे उद्घाटन दि.१९/०७/२०१८ रोजी मा.ना.श्री.दिपकबाबा शिंदे- म्हैशाळकर यांचे शुभ हस्ते पार पडले.यावेळी येथील ग्राहक ,फ्लँट धारकांना किल्ली प्रदान करणेत आली व या प्रकल्प उभारणीमधील सहभागी इंजिनीयर्स, कॉन्ट्रँक्टर्स व सप्लायर्स यांचा सन्मान चिन्ह देऊन गाैरव करणेत आला.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रधान सचिव,श्री.एम.के.कुलकर्णी हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणुन उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील जाणकार श्री.दिपकबाबा शिंदे-म्हैशाळकर यांनी या प्रकल्पाची गुणवता, समन्वय,सचोटी व पारदर्शकतेचा गुणगौरव करत असताना सध्या सरकारने आणलेले कल्याणकारी कायदे व त्यामुळे क्षेत्राच्या कार्यप्रणालीत झालेले सकारात्मंक बदल यावर नेमके व अचुक भाष्य केले.श्री. एम. के. कुलकर्णी यांनीही समाधानी व पारदर्शी व्यवहाराबाबत गुणवत्तेचे कौतुक केले. ग्राहकांच्या स्वप्नपुर्तीमुळे सर्वांग सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास बकुळबाग परिसरातील सर्व रहिवासी व मिरज मधील अनेक मान्यवर उपस्थित होते.