.

Latest News

  • Home
  • »
  • Latest News
  • »
  • शहरात निरफणसाचं झाड: मिरजेत निसर्गाचं एक अनोखं दृश्य

शहरात निरफणसाचं झाड: मिरजेत निसर्गाचं एक अनोखं दृश्य

Pranav Buildcon | 08 Apr 2023Total Views : 906
शहरात निरफणसाचं झाड: मिरजेत निसर्गाचं एक अनोखं दृश्य

नीरफणस :-
भाजीसाठी प्रसिद्ध असलेली फणसाची एक एकदम वेगळी व्हरायटी.. गोव्यापासून खाली नाॅर्थ कॅनरा, साऊथ कॅनरा ते अगदी केरळपर्यंतच्या किनारपट्टीवरील हे तिथल्या स्थानिकांचे आणि विशेषतः मंगलोर-उडपीवाल्यांचे एकदम लाडके झाड.. मी काही निमित्ताने एकदा उडपीला गेलो होतो त्यावेळी या झाडाचे दर्शन झाले आणि अक्षरशः प्रेमातच पडलो, उंचच्या उंच वाढणारं, केळी एवढी मोठी सुंदर कातरपानं आणि फणसफळं लागायला लागली की याचं सौंदर्य विचारू नका एकावेळी दोन तीनशे फणस तर नक्कीच, एवढी मोठी लाग.. नेहमीच्या फणसाला खोडाला फणस लागतात पण या झाडाला मात्र शेंड्यावर फणसफळं लागतात.. पहिला विचार आला की हे झाड मिरजेच्या कोरड्या हवामानात वाढेल-जगेल का पण या झाडाच्या देखणेपणानं मला स्वस्थ बसू दिलं नाही. उडपीत होतो त्यामुळे सरळ जवळपासची एक नर्सरी गाठली आणि पाच नीरफणसाची रोपे घेऊन आलो. ही रोपे मिरजेला घरात लावताना देखील थोड्या सावलीत लावली. आज याचे उंचच्या उंच सुंदर अशा मोठ्या देखण्या वृक्षात रुपांतर झाले आहे.. या फणसाला वर्षातून दोनदा बहर येतो एकावेळी दीडदोनशे फणसफळं लागतात.. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे याची लागवड मोठ्याप्रमाणावर मिरजेच्या अर्बन रिपब्लिक टाऊनशीपमधील मुख्य रस्त्यालगत केली आहे..
या फणसाची भाजी फार अप्रतिम होते. आणि हो, योग्य मसाला वापरला तर फिश-चिकनच्या जवळपास जाणारे व्यंजन नक्की बनवता येते यामुळे साऊथकडे केरळात याला `वेगन-मीट` म्हटले जाते.. विशेषतः याचे काप अगदी फिशफ्रायच्या तोडीचे होतात पण मसाला मात्र एक्झॅट हवा..
काल-परवा घरी वेगन-चिकन आणि वेगन-फिशफ्रायचा बेत झाला.. निसर्गाची जैवविविधता आणि त्यातून निर्माण झालेले चमत्कार पाहीले की अगदी हरवून जायला होतं..
किशोर पटवर्धन,
पाॅट ओॅर्चर्ड, अर्बन रिपब्लिक टाऊनशीप मिरज..

Send Us Enquiry

Pranav Buildcon Projects
Have any Project in Mind..?? We will make it possible..
If you have any queries, send us an enquiry
Send Enquiry