रथसप्तमी व जागतिक सुर्यनमस्कार दिना निमित्त पतंजली योगपीठ हरिद्वार आणि फडके क्लासेस मिरज , अंतर्गत पतंजलि योग समिती यांनी नियोजित केलेला आणि प्रणव बिल्डकाँन प्रा. लि. यांनी प्रायोजित केलेला ‘तीन दिवस
Pranav Buildcon | 28 Jan 2023Total Views : 749रथसप्तमी व जागतिक सुर्यनमस्कार दिना निमित्त पतंजली योगपीठ हरिद्वार आणि फडके क्लासेस मिरज , अंतर्गत पतंजलि योग समिती यांनी नियोजित केलेला आणि प्रणव बिल्डकाँन प्रा. लि. यांनी प्रायोजित केलेला ‘तीन दिवसीय इंटिग्रेटेड योग साधना’ हा कार्येक्रम मिरज येथील अर्बन रिपब्लिक टाऊनशिपमधील ऑक्सीजन पार्क गार्डन मध्ये संपन्न झाला.
जागतिक सुर्यनमस्कार दिना चे ओचित्य साधून दिनांक २६,२७ व २८ जानेवारी २०२३ रोजी तीन दिवसीय निःशुल्क इंटिग्रेटेड योग साधना शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमात एकूण सुमारे एकशे पंचवीस हून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि प्रत्येकी सुमारे १०८ सूर्यनमस्कार घालण्यात आले. आपल्या सर्व शारीरिक व मानसिक व्याधिंचे समाधान या शिबिरामध्ये सांगितले गेले.या उपक्रमाची सांगता शनिवार दिनांक २८ रोजी रथसप्तमीच्या दिवशी झाली, त्यादिवशी जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या औचित्याने व्यापकरीत्या सुर्यनमस्कार अभियान आयोजन केले होते तरी सदर उपक्रमास जास्तीत जास्त संख्येने आपल्या परिवारासह तिन्ही दिवस उपस्थित राहून योगआनंद व आरोग्यलाभ अनेक जणांनी घेतला. सदरचा उपक्रम मिरज येथे नवीन निर्माण होत असलेल्या अर्बन रिपब्लिक टाऊनशीपमधील योगधामामध्ये आयोजित केलेला असून हे ठिकाण सुप्रसिद्ध अशा आॅक्सीजन पार्क लगत आहे.
श्री. किशोर पटवर्धन, प्रणव बिल्डकाॅन यांच्या संकल्पनेतून हेल्थ हब (आरोग्यधाम) म्हणून विकसित केले जात आहे. अर्बन रिपब्लिक टाऊनशिप येथे भव्य असे योगधाम, अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक, अत्याधुनिक टर्फकोर्ट अशा आरोग्यपूरक सामायिक सोयी सुविधा असलेला टाऊनशिपचा सगळा परिसर आज भव्य स्वरूपात लोक सेवेसाठी निर्माण केला जात आहे.या जागतिक सूर्यनमस्का हेल्थर दिन/रथसप्तमी,शिबिर उपक्रमात सहभागी साधकांना पतंजलि तर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले गेले .दि.२८/०१/२३ रोजी कार्यक्रम समापनानंतर प्रणव बिल्डकॉन तर्फे हर्बल टी देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फडके क्लासेस चे श्री रवींद्र फडके व पतंजली योग पीठाचे श्री देशपांडे यांनी केले.