पॉट ऑर्चर्ड – निसर्गदत्त सुखशांतीचा निरंतर अनुभव
Pranav Buildcon | 11 Nov 2022Total Views : 905पॉट ऑर्चर्ड – निसर्गदत्त सुखशांतीचा निरंतर अनुभव
महाराष्ट्र राज्यातील शहरी भागात मनपा-नपा हद्दीतल्या मोकळ्या खाजगी जागा-भूखंडावर घनदाट वृक्ष लागवड करणेची क्रेझ लोकांमध्ये निर्माण व्हावी आणि ही एक लोकचळवळ म्हणून उदयास यावी या कल्पनेचा पुरस्कार मी गेली अनेक वर्षे करत आहे. शहराच्या हद्दीत स्वतःच्या मालकीच्या रिकाम्या जागेवर किंवा भूखंडांवर घनदाट वृक्ष लागवड करायला जागामालक सहसा तयार होत नाहीत, त्याचे कारण म्हणजे भविष्यातील आवश्यकतेनुसार जागेचा इमारती वापर करणेसाठी त्याला झाडे काढता येत नाहीत आणि याला कारण म्हणजे कालबाह्य असलेले जुनाट कायदे. या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी मी सन २०१६ पासून शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे. सध्या या कायद्यातून बांबूची सुटका झाली आहे त्यामुळे बांबूची लागवड सर्वत्र मुक्तपणे सुरु झालेली दिसते. पण बांबूप्रमाणेच इतर अन्य अनेक वृक्ष आणि वनसंपदा लागवड करण्याजोग्या आहेत, झपाट्याने वाढू शकतात आणि पर्यावरण जास्त संतुलित होऊ शकते, पण सध्याच्या प्रचलित कायद्यात बदल झाल्याखेरीज खाजगी जागांवर लोक व्यापक प्रमाणावर वृक्षलागवडीसाठी पुढे येतील असे वाटत नाही. माझ्यासारख्या पर्यावरणप्रेमी व्यक्तीला या जुनाट कायद्यातून काही मार्ग काढता येईल का आणि वृक्षसेवा करता येईल का असे सारखे वाटत होते आणि लॉकडाऊन काळातल्या विचारमंथनामध्ये तो एकदाचा सापडला आणि मिरजमध्ये साकारला गेला एक आगळावेगळा प्रकल्प “पॉट ऑर्चर्ड”...