जागतिक सुर्यनमस्कार दिना निमित्त केळकर योग वर्गातर्फे जागतिक सुर्यनमस्काराचे औचित्य साधून सामूहिक108 सुर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम
Pranav Buildcon | 29 Jan 2023Total Views : 863जागतिक सुर्यनमस्कार दिना निमित्त केळकर योग वर्गातर्फे दिनांक 29-1-2023 या रोजी सकाळी 6.30 वाजता जागतिक सुर्यनमस्काराचे औचित्य साधून सामूहिक108 सुर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम सुप्रसिद्ध ऑक्सीजन पार्कलगत मिरज येथे नव्याने निर्माण होत असलेल्या अर्बन रिपब्लिक टाऊनशीपमधील योगधामामध्ये आयोजित केलेला होता.श्री. किशोर पटवर्धन, प्रणव बिल्डकाॅन यांच्या संकल्पनेतून हेल्थ हब (आरोग्यधाम) म्हणून विकसित केले जात आहे. अर्बन रिपब्लिक टाऊनशिप येथे भव्य असे योगधाम, अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक, अत्याधुनिक टर्फकोर्ट अशा आरोग्यपूरक सामायिक सोयी सुविधा असलेला टाऊनशिपचा सगळा परिसर आज भव्य स्वरूपात लोक सेवेसाठी निर्माण केला जात आहे. या उपक्रमात 238 जणांनी सहभाग नोंदविला यावेळी केळकर योग वर्गातील खेळाडूंनी सुंदर अशी योगासनांची प्रात्यक्षिके साजर केली विशेष बाब म्हणजे या उपक्रमात सर्वात लहान साईशा गुरव व प्रांजल म्हेत्रे वय 6 वर्षे ते सर्वात मोठ्या शरयू पटवर्धन वय 77 वर्षे यांनी सहभाग नोंदवला तसेच अंकली या गावच्या बापूसाहेब रामचंद्र खवाटे प्रशालेच्या विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या या सर्वांचा नगरसेविका सौ अनिता वनखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्व सहभागी योग साधकांना सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन केळकर योग वर्गाच्या सौ अंजली केळकर मोहन जोशी संजय कट्टी दिपक दुर्गाडे कुणाल माने आशीष माळी अनिकेत म्हेत्रे प्रतिष्ठा माने रुद्राक्ष माने यांनी केले.
अर्बन रिपब्लिक टाऊनशिप येथे भव्य असे योगधाम, अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक, अत्याधुनिक टर्फकोर्ट अशा आरोग्यपूरक सामायिक सोयी सुविधा असलेला टाऊनशिपचा सगळा परिसर आज भव्य स्वरूपात लोक सेवेसाठी निर्माण केला जात आहे. सहभाग प्रमाणपत्र दिले गेले कार्यक्रम समापनानंतर प्रणव बिल्डकॉन तर्फे हर्बल टी देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.