किशोर पटवर्धन: प्रयोगशील, निसर्गप्रेमी बांधकाम व्यावसायिक सांगली-मिरजेच्या नागरी वैभवात भर घालणारे बांधकाम व्यावसायिक
Pranav Buildcon | 04 Dec 2022Total Views : 828किशोर पटवर्धन: प्रयोगशील, निसर्गप्रेमी बांधकाम व्यावसायिक
सांगली-मिरजेच्या नागरी वैभवात भर घालणारे बांधकाम
व्यावसायिक अशी किशोर पटवर्धन यांची ओळख आहे.
त्यांच्या `प्रणव बिल्डकॉन`तर्फे महापालिका क्षेत्रात वैविध्यपूर्ण
असे बांधकाम प्रकल्प राबवण्यात आले आहेत, ज्यातून या
शहराच्या नागरीकरणाला दिशा मिळाली आहे. त्यांच्या प्रत्येक
प्रकल्पाला निसर्गाचा चेहरा असतो. निसर्गपूरक रचनेभोवतीच
त्यांचे बांधकाम प्रकल्प उभे राहतात. सतत प्रयोगशील असणारी
ही व्यक्ती जगभरात जे-जे चांगले ते सांगलीत आले पाहिजे, या
विचारांची आहे. सांगली-मिरजेच्या संस्थानिक पटवर्धन घराण्याचा
वैभवशाली वारसा त्यांनी कृतिशीलतेने पुढे नेला आहे.