आज जेष्ठ क्रिकेट समालोचक आणि स्पोर्ट्स जर्नलिस्ट सुनंदनजी लेले यांची मिरजेतील प्रणव बिल्डकाॅनच्या अर्बन रिपब्लिक टाऊनशिपला सहकुटुंब सदिच्छा भेट..
Pranav Buildcon | 21 Mar 2023Total Views : 1584आज जेष्ठ क्रिकेट समालोचक आणि स्पोर्ट्स जर्नलिस्ट सुनंदनजी लेले यांची मिरजेतील प्रणव बिल्डकाॅनच्या अर्बन रिपब्लिक टाऊनशिपला सहकुटुंब सदिच्छा भेट..*
या टाऊनशीपमधील आॅक्सीजन पार्कमध्ये पाॅट-ओॅर्चर्ड हा एक आगळावेगळा पर्यावरणपुरक प्रकल्पही निर्माण केला आहे, इथे फिरताना असंख्य जातीच्या विविध पक्ष्यांचे दर्शन झाले आणि सर्वांनाच एक अद्भुत अनुभव मिळाला. मिरजेतील ऑक्सीजन पार्कमधील दुर्मिळ झाडे, वैविध्यपूर्ण फळझाडं आणि फुलं याच वर्णन सुनंदनजींनी `BUFFET FOR BIRDS` अशा नाविन्यपूर्ण शैलीमध्ये संबोधून केलं आणि पाॅट ओॅर्चर्डला एक वेगळीच हटके ओळख मिळाली..
दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी टाऊनशीप असलेल्या अर्बन रिपब्लिक येथील आरोग्य व स्पोर्टस् रिलेटेड सामायिक सोयीसुविधा पाहून ते एकदम खुश झाले.. टाऊनशीपचा हा प्रकल्प नक्कीच या संपूर्ण भागाच्या विकासासाठी वैभवशाली असल्याचे असे मत त्यांनी आज व्यक्त केले.
प्रणव बिल्डकॉनचे चेअरमन किशोर पटवर्धन, डायरेक्टर प्रणव पटवर्धन, त्यांच्या पत्नी पूजा पटवर्धन, तसेच स्नेही अजित पोतदार आणि सुनील दिवेकर या सदिच्छा भेटीवेळी उपस्थित होते..