अर्बन रिपब्लिक टाउनशिप शेजारील बदलांचा नवा अध्याय:कमानवेस ते मनोज शिंदे घर रस्त्याचा होतोय कायापालट: मात्र नागरिकांच्या बेशिस्तीपुढे प्रशासन हातबल
Pranav Buildcon | 14 Nov 2024Total Views : 906
कमानवेस पासून मनोज शिंदे या रस्त्याचे काम सध्या जोरात सुरु आहे येथील विकसक आणि महापालिकेच्या हा रस्ता होत असून काही दिवसांपासून पडलेला कचऱ्याचा ढीग आज सकाळपासून नाहीसा झाला आहे. येथील उच्चभ्रु वस्ती असलेला आणि नागरिकांना आता शिस्तीचे धडे द्यावे लागतील कारण यापूर्वीही कचरा टाकण्यासाठी महापालिकेने विशेष सोय केली असता नाही नागरिकांकडून मात्र कचरा रस्त्यावर टाकला जायचा आता या रस्त्याचे दुहेरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. विकसक किशोर पटवर्धन यांच्या प्रयत्नातून रस्त्याकडेला वॉकिंग ट्रॅक आणि छोटी गार्डनही त्यामुळे या भागाला चांगले दिवस येतील, मात्र येथील नागरिकांनी कचरा घंटागाड्यांमध्येच आपला कचरा टाकावा जरी गाडी उशिरा येत असेल तरी गाडीची वाट पहावी या रस्त्याचे विकसनाचे काम सध्या जोरात सुरू असल्याने नागरिकांनी येथे कचरा परत टाकू नये याची विशेष दक्षता घ्यावी. मिरज शहराकडे जाणारा हा एक प्रमुख मार्ग आहे. याआधी मिरज शहरात प्रवेश करताना नाके मुरडत प्रवेश करावा लागत होता कमानवेस मधील स्वच्छतागृह सुद्धा आता हटवण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण कमी आहे. माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, माजी नगरसेवक सुरेश आवटी यांच्या प्रयत्नातून आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हे काम किशोर पटवर्धन करत आहेत.
याबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ते म्हणाले की ‘मिरज शहरासारखी ऐतिहासिक नगरी दिवसेंदिवस बकाल होत चालली होती मात्र प्रशासकीय काळात आम्ही वेळोवेळी काही ठिकाणी योग्य निर्णय घेतल्यामुळे आणि भविष्यात मिरज शहराला चांगला आकार देण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय निश्चितपणे घेऊ’ माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पासून मनोज शिंदे घर रस्त्याच्या डाव्या बाजूला किशोर पटवर्धन त्यांच्या प्रयत्नातून एक चांगले उद्यान वॉकिंग ट्रॅक आणि चांगल्या प्रतीचा रस्ता करणार आहेत लवकरच हे काम पूर्ण होईल’